संपादक-२०२५ - लेख सूची

मनोगत

‘सर्वेऽपि सुखिनः सन्तु’मधील सुख ह्या शब्दाची व्याप्ती मोठी, त्यामुळे त्याचे मोजमापही अवघड. greatest good मध्ये ‘सुख’ ह्या शब्दाची छटा आहे. अधिकाधिक लोकांचे अधिकाधिक भले व्हावे, अर्थात अधिकाधिक लोक सुखी असावेत, हा तो भाव.  पण, ‘सर्वेऽपि’चा भाव greatest number मध्ये येऊ शकत नाही, त्यामुळे हे उद्दिष्ट बहुसंख्याकवादात अडकण्याची शक्यता जास्त. तसेच ह्यात सार्वकालिक भाव नसल्याने त्यात …

आवाहन

स्नेह. सर्वेपि सुखिन: संतु — म्हणजेच सर्व लोक सुखी व्हावेत ही संकल्पना प्राचीन भारतीय परंपरेत खोलवर रुजलेली आहे. पाश्चिमात्य विचारसरणीत ह्याला समांतर कल्पना “the greatest good for the greatest number” ह्या उपयोगितावादी तत्त्वज्ञानातून व्यक्त झाली आहे. ह्याच संदर्भात चार्वाक किंवा लोकायत, ह्या प्राचीन भारतीय इहवादी विचारसरणीची आठवण होते. लोकायताचे वैशिष्ट्य असे समजतात की त्यात केवळ प्रत्यक्षच प्रमाण मानले जात …

मनोगत

ग्रामस्वराज्यावरील हा विशेषांक मोहन हिराबाई हिरालाल ह्यांच्या कार्यास समर्पित आहे. ह्याविषयी आमचे मित्र सोपान जोशी ह्यांच्याशी होत असलेल्या चर्चेतून निघाले की अंकाचा आवाका वाढवायचा तर ह्यात महाराष्ट्राबाहेरील अनुभवदेखील यायला हवे. अनुषंगाने हिंदी भाषेतील लेखही ह्या अंकात समाविष्ट झाले. त्याची जुळवाजुळव करण्यात वेळ गेल्याने एरवी एप्रिलमध्ये प्रकाशित होणारा अंक आपल्यापर्यंत पोहोचण्यास विलंब झाला, त्याबद्दल दिलगीर आहोत.  …

मनोगत – हिंदी

ग्राम स्वराज्य पर यह विशेषांक मोहन हिराबाई हिरालाल और उनके काम को समर्पित है. इस अंक का स्वरूप जरा अलग है. हमारे मित्र सोपान जोशी से बातचीत के दौरान यह लगा कि इस विषय पर महाराष्ट्र के बाहर के अनुभव भी इसमें शामिल होने चाहिए. वही बात आगे बढ़ी और यह तय हुआ कि हिंदी …

आवाहन

आपले स्नेही मोहन हिराबाई हिरालाल ह्यांचे २३ जानेवारी २०२५ रोजी निधन झाले. ग्रामस्वराज्याचा विचार हा नेहमीच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला. अनेक दशकांच्या संवाद आणि सहकार्यातून गडचिरोलीतील मेंढा-लेखा गावाने त्यांचे ते स्वप्न साकार केले. ‘आजचा सुधारक’चा आगामी अंक ग्रामस्वराज्यावर घ्यावा असा मानस आहे. सद्य परिस्थितीत हा विषय महत्त्वाचा तर वाटतोच, शिवाय त्यात मोहनभाईंना आदरांजलीही अंतर्भूत आहे. …

मनोगत

स्नेह. नव्या वर्षाच्या सुरुवातीला स्वतःसाठी काही संकल्प आखायचे आणि पुढे वर्षभरात त्यातील किती पूर्ण होतात, किती अपूर्ण राहतात ह्याचा हिशोब मांडल्यावर अनुषंगाने आनंदी वा दुःखी व्हायचे, हे आपल्यापैकी अनेकांसोबत वयाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात झाले असतेच!  ह्या संकल्पांमध्ये एक नागरिक ह्या नात्याने आपण किती आणि कुठले संकल्प करतो, ह्याचाही विचार असायला हवा. विवेकाने केलेले असे …